PM Kisan 20th installment 2025 PM-Kisan सन्मान निधी योजना बंद झाली आहे का? २०वी किस्त (विसावा हप्ता) कधी जमा होईल? या ब्लॉगमध्ये जाणून घ्या सध्याचा अपडेट, अफवांचे खंडन आणि पुढील नियोजन!
अलीकडच्या काळात सोशल मीडियावर अफवा पसरली की पीएमकिसान योजना बंद झाली आहे. विशेषतः विसावा हप्ता (20वी किस्त) न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
PM Kisan 20th installment 2025
✅ पण केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत अधिसूचना नाही की ही योजना बंद होणार आहे.
✅ याउलट, २०२५–२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी ₹63,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे — म्हणजेच योजना अजूनही सक्रिय आहे.
📎 अधिकृत वेबसाईट: PM-Kisan.gov.in

👉आताच पाहा तुम्हाला विसावा हप्ता मिळणार का?👈
विसावा हप्ता का उशीर झाला?
PM Kisan 20th installment 2025 पीएम किसान विसावा हप्ता (20वी किस्त) जूनच्या तिसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता होती, पण अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.
यामागील संभाव्य कारणे:
- पीएमकिसान eKYC अपडेट न केलेल्या लाभार्थ्यांचे पैसे थांबवले गेले आहेत.
- पीएमकिसान बँक खाते लिंक आणि आधार लिंकिंगमध्ये अडचण.
- काही शेतकऱ्यांनी सरेंडर अर्ज चुकून भरले, त्यामुळे त्यांना नव्याने अर्ज करायला सांगितले जात आहे.
- केंद्र सरकारच्या तांत्रिक तपासणी प्रक्रियेमुळे विलंब होतोय.
हे ही पाहा : सुधारित पीक विमा योजना 2025: हप्ता दर, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया
विसावा व 21वा हप्ता एकत्र येणार?
PM Kisan 20th installment 2025 बऱ्याच शेतकरी यूट्यूब चॅनल्स आणि WhatsApp ग्रुपवर बोललं जातं की:
“विसावा आणि 21वा हप्ता एकत्र आणि वाढीव रक्कमेसह मिळेल!”
✅ पण पीएमकिसान योजना बंद अफवा प्रमाणेच, ही माहिती देखील अधिकृतपणे अप्रमाणित आहे.
- उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारला शिफारस केली होती की वार्षिक हप्ता ₹6,000 वरून ₹30,000 करण्यात यावा, पण
- केंद्र सरकारकडून अजून कोणताही निर्णय किंवा हालचाल नाही.
- पीएमकिसान बजेट 2025 मध्ये वाढीव तरतूद केलेली नाही, त्यामुळे हप्ते वाढण्याची शक्यता कमीच.

👉धान बोनस आला नाही, तर हे नक्की पहा…👈
केंद्र सरकार निर्णयाचा उशीर – काय वाट बघायची?
PM Kisan 20th installment 2025 शेतकरी प्रश्न: केंद्र सरकार पीएमकिसान हप्ता वितरण 2025 साठी इतका वेळ का घेत आहे?
✅ मागील हप्त्यांच्या तुलनेत यावेळी अधिक वेळ लागत आहे कारण:
- eKYC प्रक्रिया आणि आधार पडताळणी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे.
- जिल्हास्तरावर आणि पीएमकिसान लाभार्थी यादी 2025 अपडेट केली जात आहे.
- सरेंडर झालेल्या लाभार्थ्यांचे पुनर्नियोजन सुरू आहे.
हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी फार्मर युनिक आयडी म्हणजे काय? ग्रेस्टेक पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया, फायदे आणि महत्त्वाची माहिती
शेतकऱ्यांसाठी उपाय आणि सूचना
- ✅ तुमचं नाव पीएमकिसान लाभार्थी यादीत आहे का?
- ✅ eKYC स्टेटस तपासायचंय?
- ✅ आवश्यक तपासणी:
- आधार बँक खात्याशी लिंक आहे का?
- बँक खात्याचे IFSC कोड योग्य आहे का?
- पीएमकिसान पोर्टलवर अर्जात काही त्रुटी आहेत का?
पुढचं काय?
➡ पीएम किसान सन्मान निधी योजना लवकर बंद होणार नाही.
➡ 20वी किस्त जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा जूनच्या अखेरीस (27 ते 29 जून दरम्यान) येऊ शकते.
➡ 21वी किस्त पारंपरिक वेळेत – ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये दिली जाण्याची शक्यता.

हे ही पाहा : जून २०२५ मध्ये पीक विमा वितरणात गोंधळ – शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्तरं
अफवांवर विश्वास ठेऊ नका
- पीएमकिसान योजना बंद अफवा चुकीची आहे.
- 20वी किस्त मिळेल, पण eKYC, आधार लिंकिंग पूर्ण करून ठेवा.
- 21वी किस्त सुद्धा वेळेवर येईल. PM Kisan 20th installment 2025
- कोणतीही PM Kisan Official Notification आल्यावरच विश्वास ठेवावा.