Gold Silver Rate Today 28 January 2025 : Budget पूर्वी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Rate Today 28 January 2025 : Budget पूर्वीच सोने आणि चांदीने ग्राहकांना स्वस्ताईचा सांगावा धाडला. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत घसरण झाली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती?

मागील दोन आठवड्यात सोन्यासोबतच चांदीने दरवाढीचा दणका दिला. सोन्याने तर मोठी झेप घेतली. मागील दहा-बारा दिवसात सोने 000 रुपयांनी महागले. तर चांदीने मरगळ झटकत हजारांची दरवाढ नोंदवली. Gold Silver Rate Today

Khabar lite

राज्यात ‘नमो ड्रोन दीदी योजना’ सुरू – महिलांसाठी कौशल्य विकास आणि रोजगाराची सुवर्णसंधी!

ऐन लग्नसराईत सोने आणि चांदीची ही घोडदौड वधू-वर मंडळींना मनस्ताप देऊन गेली. तर या आठवड्याच्या सुरूवातीला दोन्ही धातुत घसरण झाली. चांदी एक हजाराने उतरली. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीच्या आता अशा आहेत किंमती. (Gold Silver Rate Today 28 January 2025 )

सोन्याचा ग्राहकांना दिलासा

मागील दोन आठवड्यात सोने 3000 रुपयांनी महागले. सोन्याने मोठी मजल मारल्याने ग्राहक चिंतेत होता. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोने 170 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 75,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 82,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. Gold Silver Rate Today

Khabar lite

आंतरजातीय विवाह करा आणि मिळवा तब्बल 50 हजार रुपये – सरकारची खास योजना!

चांदी हजाराने उतरली

मागील आठवड्यात चांदी 4 हजार रुपयांनी महागली आणि 2 हजारांनी स्वस्त झाली होती. त्यानंतर 18 ते 23 जानेवारीपर्यंत भावात बदल दिसला नाही. तर 24 जानेवारीला 1 हजार रुपयांनी किंमती वधारल्या. आता 27 जानेवारी रोजी त्यात 1 हजार रुपयांची घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 80,397, 23 कॅरेट 80,075, 22 कॅरेट सोने 73,644 रुपयांवर आहे.

Khabar lite

महिलाओं के लिए सुनहरा मौका! व्यवसाय शुरू करने पर ₹50,000 की आर्थिक मदद

18 कॅरेट आता 60,298 रुपये, 14 कॅरेट सोने 47,032 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,274 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.

Khabar lite

लाडकी बहिण योजनेत येणार नवीन ऑप्शन

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment