Farmer Digital ID Download शेतकरी विशिष्ट ओळखपत्र (Farmer Unique ID) कसं मिळवायचं, खरंच हे कार्ड आवश्यक आहे का, कोणती वेबसाईट आहे, आणि ₹0 मध्ये कार्ड डाउनलोड करण्याचं सत्य — सर्व माहिती इथे मिळवा.
Farmer Digital ID Download
शेतकरी विशिष्ट ओळखपत्र, ज्याला आपण Farmer Unique ID म्हणतो, हे भारत सरकारच्या ग्रीसटॅक (AgriStack) उपक्रमाचा भाग आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा युनिक डिजिटल ओळख क्रमांक तयार केला जातो.

👉शेतकरी विशिष्ट ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👈
का गरजेचं आहे हे ओळखपत्र?
Farmer Digital ID Download तुमच्या शेतीविषयक सर्व सरकारी योजनांसाठी हे युनिक नंबर अत्यंत महत्त्वाचा आहे.
🟢 यामध्ये खालील योजनांसाठी वापर होतो:
- पीएम किसान सन्मान निधी
- पीक विमा योजना
- केसीसी (Kisan Credit Card)
- पीक कर्ज
- निसर्ग आपत्ती नुकसान भरपाई
सध्या कार्ड गरजेचं आहे का?
सध्या फक्त आणि फक्त Farmer Unique ID नंबर गरजेचा आहे. कोणतेही कार्ड प्रिंट किंवा झेरॉक्स आवश्यक नाही. काहीजण ₹50 ते ₹100 च्या दरात कार्ड डाउनलोड करुन देतो, पण ते चुकीचं आहे.
हे ही पाहा : पावसाळी रेशन वाटप योजना 2025: गैरप्रकार, कारवाई आणि शासनाचे उपाय
शेतकरी विशिष्ट ओळखपत्र डाउनलोड कसं करावं?
अधिकृत वेबसाईट:
Step-by-step मार्गदर्शक:
- mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर जा.
- आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका.
- OTP टाका आणि प्रोफाइल व्हेरिफाय करा.
- तुमचा Farmer Unique ID क्रमांक स्क्रीनवर दिसेल.
- तुम्ही तो सुरक्षितपणे जतन करा.
हे कार्ड कोणत्या राज्यात लागू आहे?
Farmer Digital ID Download भारताच्या २४ राज्यांमध्ये हे AgriStack योजना प्रभावीपणे सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य आहे जिथे १ कोटीहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

👉नावीन्यपूर्ण योजना निवड प्रक्रिया अपडेट👈
ऑनलाईनच का करावं? एजंटांकडून टाळा फसवणूक
Farmer Digital ID Download काही एजंट ₹50–₹100 घेऊन तुमचं Farmer ID Card प्रिंट देतात. पण हे कार्ड सध्या सरकारने अधिकृतपणे दिलं जात नाही. हे केवळ एक नंबर आहे आणि तो फक्त सरकारी पोर्टलवरच उपलब्ध आहे.
डेटा गोळा प्रक्रिया काय आहे?
सध्या ग्रीसटॅक अंतर्गत शेतकऱ्यांचे जमिनीशी संबंधित डेटा, आधार लिंकिंग, व केवळ काही पिक माहिती गोळा होत आहे.
🟢 पुढील टप्प्यात:
- बँक डिटेल्स
- केसीसी
- पशुधन माहिती
- पिक कर्ज डेटा
हे ही पाहा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 – 7386 गावांची यादी आणि डॅशबोर्डवर माहिती कशी पाहावी?
अन्नदाता कार्ड vs Farmer ID – फरक काय?
Farmer Digital ID Download अन्नदाता कार्ड ही एक वेगळी योजना आहे. याचा Farmer Unique ID शी काहीही संबंध नाही. त्यामुळे एकाचे डॉक्युमेंट दुसऱ्याला वापरू शकत नाही.
महत्वाचं: कोणतेही कार्ड सध्या वितरित होत नाही!
फक्त Farmer ID नंबर ऑनलाईन मिळतो. कोणतीही फिजिकल कार्ड देण्याची सुविधा अजून सुरु झालेली नाही. त्यामुळे कोणीही जर कार्ड देतोय असं सांगत असेल, तर ते फसवणूक असू शकते.
भविष्याचा प्लॅन – कधी मिळेल प्रत्यक्ष कार्ड?
2026 नंतर जेव्हा सगळा डेटा गोळा होईल – बँक, जमिन, केसीसी – तेव्हा सरकार Farmer ID Card किंवा Smart Agri Card सुरू करू शकते. तोपर्यंत फक्त युनिक नंबर पुरेसा आहे.

हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट! कागदपत्र पडताळणी प्रक्रिया आणि अंतिम मुदत
विषय | माहिती |
---|---|
कार्ड लागतं का? | नाही, फक्त नंबर |
शुल्क किती? | मोफत |
कोणती वेबसाईट? | mhfr.agristack.gov.in |
एजंटांकडून घ्यावं का? | टाळा, फसवणूक संभव |
योजनेसाठी आवश्यक आहे का? | होय, PM किसान, विमा, KCC साठी |
हे ही पाहा : नागरी सहकारी बँकांसाठी “एक रकमी कर्ज परतफेड योजना 2025” – सर्व माहिती
अधिकृत लिंक
- Maharashtra AgriStack Farmer Portal: https://mhfr.agristack.gov.in
- Mahadbt Farmer Login: https://mahadbt.maharashtra.gov.in
- AgriStack Project Overview: https://agristack.co.in