AgriStack Yojana Maharashtra कापूस आणि सोयाबीनसाठी 1,000 कोटींचा निधी, AgriStack डिजिटल कृषी योजना लागू, आणि कृषी विद्यापीठांमधील पदभरतीतील सवलती – शेतकऱ्यांसाठी 2025 चा महत्त्वाचा निर्णय.
AgriStack Yojana Maharashtra
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ होईल अशा ₹1,000 कोटींच्या योजनांचा मंजुरी, AgriStack योजनेची अंमलबजावणी, तसेच कृषी विद्यापीठांतील पदभरतीसाठी नियम शिथिल करण्यात आले आहेत.

कापूस आणि सोयाबीनसाठी ₹1,000 कोटींचा निधी
- 88 लाख हेक्टर जमीन ही महाराष्ट्रात कापूस आणि सोयाबीन लागवडीखाली आहे.
- याच पिकांच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी राज्य सरकारने तीन वर्षांसाठी 1,000 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
- विशेष कृती योजना राबवली जाईल, ज्यामध्ये 60% निधी तंत्रज्ञानाच्या प्रसार व खते अनुदानासाठी, तर 40% निधी मूल्य साखळी विकासासाठी वापरण्यात येईल. AgriStack Yojana Maharashtra
हे ही पाहा : प्रधानमंत्री ग्रामीण योजना अंतर्गत घरकुलाला ₹५०,००० वाढीव अनुदान: पात्रता व नवीन नियम
AgriStack – डिजिटल कृषी मिशन योजनेची अंमलबजावणी
- AgriStack योजना ही केंद्र शासनाची डिजिटल कृषी सुधारणा योजना आहे.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख, पीक नमुना माहिती, आणि सरकारी योजनेचा थेट लाभ पोहोचवणे शक्य होणार आहे.
- महाराष्ट्र राज्यात याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

👉घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र शासनाचा मोठा निर्णय👈
कृषी विद्यापीठांतील पदभरतीसाठी सवलत
- राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील प्रकल्पग्रस्तांमधून ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदभरतीसाठी नियम शिथिल करण्यात आले आहेत. AgriStack Yojana Maharashtra
- यामुळे स्थानिक उमेदवारांना नोकरीच्या संधी वाढतील.
- ही भरती कृषी क्षेत्रातील विकास व संशोधनाला चालना देणारी असेल.
हे ही पाहा : महाडीबीटी पोर्टलवर टोकन यंत्र अनुदानासाठी अर्ज कसा करावा?
कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
- या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली जाणार आहे.
- ही समिती योजना, निधीवाटप, आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोच या बाबींवर लक्ष ठेवेल.

हे ही पाहा : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) 2025: महाराष्ट्रासाठी सर्वेक्षण मुदतवाढ व संपूर्ण माहिती
शेतकऱ्यांसाठी काय बदल?
✅ आर्थिक मदत:
- खते, बियाणे व तंत्रज्ञानासाठी थेट अनुदान मिळणार.
- उत्पादन खर्चात कपात होऊन नफा वाढेल.
✅ नोकरी संधी:
- कृषी विद्यापीठांमध्ये स्थानिकांकरिता सरकारी नोकर्या उपलब्ध होतील. AgriStack Yojana Maharashtra
हे ही पाहा : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण योजना: ओळखपत्र मिळवून विविध योजनांचा लाभ घ्या
✅ डिजिटल फायदे:
- AgriStackमुळे शेतकऱ्यांची माहिती एकत्रित होऊन लाभ योजनांचे वितरण अधिक अचूक होईल.