Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp Village List नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत निवडलेल्या 7386 गावांची यादी, जिल्हानिहाय माहिती आणि प्रकल्पाचा अधिकृत डॅशबोर्ड येथे पहा. गावाचे नाव सर्च करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती.
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp Village List
राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आश्वासक बातमी म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 (NDKSP Phase 2) ला सरकारकडून मंजुरी मिळाली असून, 7386 गावांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

👉गावांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा👈
काय आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प?
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp Village List ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात सुधारणा, पाणी नियोजन, जैवविविधता संवर्धन, शेतीशाळा, कृषी आराखडा तयार करणे, अशा अनेक गोष्टींसाठी राबवली जाते.
ही योजना पोकरा 2.0 (POCRA 2.0) म्हणूनही ओळखली जाते.
या योजनेच्या टप्पा 2 मध्ये काय विशेष?
- 7386 गावांची निवड
- डॅशबोर्ड तयार – प्रकल्प व्यवस्थापनासाठी
- जिल्हा, तालुका, गाव यानुसार यादी उपलब्ध
- शेतीशाळा, प्रशिक्षण, आर्थिक अनुदान इत्यादी बाबींचा समावेश
- लाभार्थी पात्रता, समित्या, आराखडे इत्यादींची आखणी
हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट! कागदपत्र पडताळणी प्रक्रिया आणि अंतिम मुदत
पण माझं गाव या योजनेत आहे का? हे कसं तपासायचं?
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp Village List सरकारने यासाठी एक अधिकृत डॅशबोर्ड विकसित केला आहे. या डॅशबोर्डवर तुम्ही तुमचं जिल्हा, तालुका, गाव यानुसार गावाची यादी, पुढील प्रक्रिया, आणि विविध माहिती सहज पाहू शकता.
डॅशबोर्डवर गाव कसं शोधायचं? (Step-by-Step Guide)
स्टेप 1: अधिकृत डॅशबोर्ड ला भेट द्या
स्टेप 2: “Village List” किंवा “व् रिपोर्ट” वर क्लिक करा
- तुम्हाला एक “7386 गावांची यादी” दिसेल
- “View Report (व् रिपोर्ट)” वर क्लिक केल्यावर संपूर्ण लिस्ट एक्सेल सारखी दिसेल

👉नावीन्यपूर्ण योजना निवड प्रक्रिया अपडेट👈
स्टेप 3: जिल्हा, तालुका आणि गाव निवडा
- जिल्हा सिलेक्ट करा
- पुढे Subdivision सिलेक्ट करा (उपविभाग)
- तालुका निवडा
- यानंतर त्या तालुक्यांतली गावांची यादी दिसेल
स्टेप 4: गावाचं नाव सर्च करा
- गावाचं नाव टाकून सर्च केल्यावर ते गाव योजनेत समाविष्ट आहे का ते दिसेल
स्टेप 5: पुढील माहिती काय पाहता येईल?
- गावातील शेतीशाळा
- लाभार्थ्यांची माहिती
- अनुदान वाटप
- प्रकल्प प्रगती
- जलसंधारणाचे आराखडे
हे ही पाहा : सुधारित पिक विमा योजना महाराष्ट्र 2025: 24 जून GR नुसार शेतकऱ्यांसाठी कप अँड कॅप मॉडेल
डॅशबोर्डवर आणखी काय माहिती मिळते?
घटक | माहिती |
---|---|
जिल्हानिहाय प्रगती | ✅ |
शेतीशाळा तपशील | ✅ |
आर्थिक तरतुदी | ✅ |
प्रशिक्षण सत्रांची माहिती | ✅ |
ग्रामपंचायत स्तरीय यादी | ✅ |
माझं गाव यादीत नसेल तर?
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp Village List जर तुमचं गाव यादीत नसेल, तर:
- तुमच्या कृषी विभाग अधिकारी/तहसील कार्यालयात संपर्क करा
- योजना पुढील टप्प्यांत वाढवली जाईल का याबाबत माहिती मिळवा
- तुमच्या ग्रामपंचायत मार्फतही प्रकल्पात सामावून घेता येतो

हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी फार्मर युनिक आयडी म्हणजे काय? ग्रेस्टेक पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया, फायदे आणि महत्त्वाची माहिती
महत्त्वाची टीप:
योजना सध्या केवळ निवडलेल्या 7386 गावांमध्येच राबवली जात आहे, त्यामुळे लिस्ट तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अधिकृत डॅशबोर्ड लिंक:
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp Village List मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो शेतकऱ्यांना आधुनिक कृषी पद्धती, जलसंधारण, जैवविविधता, आणि टिकाऊ शेतीच्या दिशेने मार्गदर्शन करतो.
7386 गावांचा समावेश हा या प्रकल्पाचा एक मोठा टप्पा असून, तुमचं गाव या योजनेत आहे का, हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने डॅशबोर्डवर पाहू शकता.