PM aawas yojana ग्रामीण टप्पा-2: ठाणे जिल्ह्यातील 17975 कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM aawas yojana ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १७ हजार ९७५ पात्र लाभार्थ्यांना ‘वन क्लिक’ प्रणालीद्वारे पहिला हप्ता थेट बँक खात्यात जमा केला जाणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. तसेच सर्व मंजूर घरकुले लवकरात लवकर पूर्ण करण्याचा जिल्हा परिषदेचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यभरातील लाभार्थ्यांसाठी मोठा कार्यक्रम

PM aawas yojana ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. पुण्यातील बालेवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

PM aawas yojana

घरकुल लाभार्थ्यांसाठी खूशखबर, पहिला दुसरा हप्ता आला

या कार्यक्रमात वन क्लिक प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा केला जाणार आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १७ हजार ९७५ पात्र लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळणार आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील ५०० लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण नियोजन भवन येथे होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील उद्दिष्ट आणि प्रगती

PM aawas yojana टप्पा-२ साठी ठाणे जिल्ह्याला १८,२४८ उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यामध्ये अंबरनाथ ९१६, भिवंडी ४,५२१, कल्याण १,०९६, मुरबाड ५,८७३ आणि शहापूर ५,८४२ लाभार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी १७,९७५ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. उर्वरित २७३ लाभार्थ्यांच्या बँक खात्याच्या प्रक्रियेनंतर त्यांनाही निधी मंजूर केला जाईल.

अनुदानाची रचना आणि लाभ

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण १,५८,७३० रुपये अनुदान दिले जाते. यामध्ये पहिला हप्ता १५,००० रुपये, दुसरा हप्ता ७०,००० रुपये, तिसरा हप्ता ३०,००० रुपये आणि चौथा हप्ता ५,००० रुपये आहे. याशिवाय शौचालयासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १२,००० रुपये देण्यात येतात. तसेच नरेगा अंतर्गत ९० दिवसांच्या मजुरीसाठी २९७ रुपये प्रतिदिन याप्रमाणे २६,७३० रुपये दिले जातात.

Khabar lite

“डेरी फार्म लोन योजना: नाबार्ड लोन के साथ शुरू करें अपना डेरी व्यवसाय”

तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्या:

तालुकालाभार्थ्यांची संख्या
अंबरनाथ९१५
भिवंडी४४०८
कल्याण१०८७
शहापूर५७६४
मुरबाड५८०१
एकूण१७,९७५
Khabar lite

“राज्याच्या अंतोदय अन्न योजना: ई केवायसीच्या माध्यमातून शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांची ओळख पटवा!”

ही योजना ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, गरजू लोकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळत आहे. शासनाच्या या पुढाकारामुळे अनेक कुटुंबांचे स्वप्न साकार होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment